नवीन डीजे व्यवसाय सुरू करून यशस्वी करायचा असेल किंवा चालू असलेला डीजे व्यवसायमध्ये भरारी घ्यायची असेल तर तुमच्या प्रतिस्पर्धी उद्योजकपेक्षा काहीतरी नवीन आणि जास्त कराव लागेल, हे आधी लक्षात घेतल पाहिजे. हा व्यवसाय सर्विस व्यवसाय आहे. तुम्ही किती चांगली सर्विस देता यावर तुमचं बिझनेस अवलंबून आहे. चला तर मग या लेखात ही सर्व माहीत जाणून घेऊ.
डीजे चा वापर हा लग्न, वाढदिवस, सत्संग, सण , उत्सव , जयंत्या आणि इतर कार्यक्रमांसाठी केला जातो, या व्यवसायातून चांगले पैसे देखील कमावता येतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला डीजे चे स्किल आले पाहिजेत. उद्योजक भरारी घेण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
1) स्ट्रॅटजी :
- आपली खासियत निश्चित करा : DJ उद्योगात आपली खासियत काय असेल हे ठरवा. ह्या मध्ये लग्न, कॉर्पोरेट कार्यक्रम, क्लब, खासगी पार्टी, सन , उत्सव , जयंत्या , इत्यादी. ह्यामुळे तुमच्या व्यवसायाला नवीन टॅग भेटू शकतो आणि मार्केटिंग मध्ये याचा खूप फायदा होऊ शकतो. यामुळे गोष्टी तुमच्या व्यवसायाचा ब्रॅंड बनू शकतो.
- मार्केट रिसर्च करा : महाराष्ट्रात DJ सेवांच्या मागणी किती आहे ? मागणी आणि सेवा मध्ये काही गॅप आढळून येतो का ते शोधा. आपला टार्गेट ग्राहक आणि प्रतिस्पर्धी ओळखा. लक्षात ठेवा मार्केट रिसर्च जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला ग्राहकाना सर्विस देखील चांगल्या प्रकारे देता येईल.
- बिसनेस प्लान तयार करा: आपले व्यावसायिक उद्देश, टार्गेट ग्राहक , मार्केटिंग साठीची रणनीती, तुमच्या व्यवसायाचा रेट ठरवा , आणि व्यवसाय चालू करण्यासाठी लागणाऱ्या पैशांचे व्यवस्थापन करा.
- आवश्यक परवानगी : व्यवसाय चालू करण्यासाठी आणि व्यवसाय चालू केल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या आवश्यक परवानग्या लागणार आहेत त्याची यादी तयार करा.
2) ऑपरेशन:
- आवश्यक उपकरणाची यादी करा : CD Player, Laptop, Channel Master, Sound Box, Dj Mixer, Park Light, Mic, table, Dj Turtable, Dance Floor, Amplifier उच्च गुणवत्ता असलेले DJ उपकरण निवडा. ह्या उपकरणासाठी तुम्ही JBL किंवा AHUJA यासारख्या नामांकित कंपन्यांचे प्रॉडक्ट पाहू शकता
- ऑडिओ ट्रॅक बनवून ठेवा : डी जे साठी लागनारे ऑडिओ ट्रॅक बनवून ठेवा . विविध क्षणांसाठी आणि पसंतींसाठी विविध ऑडिओ ट्रॅक चा संग्रह करा.
- आपला स्टुडियो सेट अप करा : उपकरण ठेवण्यासाठी , प्रॅक्टिस करण्यासाठी एक जागा निंवडून आपला स्टुडियो सेट अप करा. आपले डीजे चे कौशल्य विकसित करा: प्रशिक्षणाद्वारे आणि अभ्यासाद्वारे सतत आपले DJ कौशल्य सुधारत रहा.
3) मार्केटिंग:
- एक ब्रँड इमेज तयार करा: आपल्या शैली आणि व्यक्तिमत्वातील पारंपारिक नाव, लोगो, आणि इमेज विकसित करा.
- ऑनलाईन उपस्थिती बनवा : आपल्या सेवांचा आणि संबंधित ग्राहकांसाठी बूकिंग साठी वेबसाइट आणि सोशल मीडिया प्रोफाइल तयार करा. यावरून आपल्या उद्योगाचे सोशल मीडियावर मार्केटिंग करा, रेग्युलर सोशल मिडियावर अॅक्टिव रहा.
- आपले नेटवर्क वाढवा : जिथे शक्य असेल तिथे तुमच्या ओळखी वाढवा. त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढेल.
4) आर्थिक:
- तुमच्या व्यवसायाचे दर ठरवा : बाजारीची दर संशोधन करा आणि आपल्या सेवांसाठी प्रतिस्पर्धात्मक दर ठरावा. कार्यक्रम प्रकार, कालावधी, आणि उपकरण यानुसार तुमच्या व्यवसायाचे वेगवेगळे पॅकेज बनवा.
- बजेट: सुरूवातीच्या खर्च, उपकरण विकत घेण्याच्या, मार्केटिंगच्या खर्चांच्या, आणि नियमित ऑपरेशनच्या खर्चांच्या साठी एक बजेट तयार करा.
- फंडिंग सुरक्षित करा: आपल्या व्यावसायासाठी फंडिंग आवश्यक असल्यास, व्यक्तिगत बचत, कर्ज, किंवा गुंतवणूकदाराशी संपर्कात रहा. जे तुम्हाला गरजेच्या वेळी आर्थिक मदत करतील.
- खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसवा : आपल्या उद्योगातू येणारे उत्पन्न आणि होणार खर्च यांचे विस्तृत रेकॉर्ड ठेवा आणि त्यांच्या आधारे व्यावसायिक निर्णय घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे.
लक्षात ठेवा, एका व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी नेहमीच खूप मेहनत , खूप संयम आणि खूप संघर्ष करावा लागतो. सतत उत्तम सेवा देण्याच्या आणि ग्राहकांसह चांगले संबंध तयार करण्यावर लक्ष्य केंद्रित करा ,
यामुळे दीर्घकालिक सफलता सुनिश्चित करण्यास मदत होते..
तुम्हाला आमची पोस्ट आवडल्यास तुम्ही आम्हाला कंमेंट करून कळवू शकता धन्यवाद.
डीजे व्यवसाय भारतात फायदेशीर आहे का?
डीजे चा वापर हा लग्न, वाढदिवस, सत्संग, सण , उत्सव , जयंत्या आणि इतर कार्यक्रमांसाठी केला जातो, या व्यवसायातून खूप चांगले पैसे देखील कमावता येतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला डीजे चे स्किल आले पाहिजेत. या व्यवसायात भरारी घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्धी उद्योजकपेक्षा काहीतरी नवीन आणि जास्त कराव लागेल, हे आधी लक्षात घेतल पाहिजे. हा व्यवसाय सर्विस व्यवसाय आहे. तुम्ही किती चांगली सर्विस देता यावर तुमचा बिझनेस अवलंबून आहे.
डीजे व्यवसाय सेट करण्यासाठी किती खर्च येतो ?
डीजे व्यवसायात तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्हाला डीजे व्यवसाय कमीतकमी गुंतवणूकित चालू करून मोठा करायचा असेल तर सुरुवातीला तुम्ही 8 -10 लाखांपर्यंत चांगला डीजे सेटअप करू शकता आणि हळूहळू तुमचा व्यवसाय वाढवू शकता.
डीजे साउंड सेवा व्यवसायाचे मार्केटिंग कसे करायचे?
कोणत्याही व्यवसायात मार्केटिंगला खूप महत्त्व असते. जर तुम्ही ते योग्यरित्या केले तर तुमचा व्यवसाय खूप कमी वेळात भरारी घेऊ शकतो. मार्केटिंग केल्यामुळे तुमच्या व्यवसायाचा एक ब्रॅंड बनतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाची एक वेबसाइट आणि सोशल मिडियावर तुमचे प्रोफाइल असणे गरजेचे आहे , सध्या सोशल मीडिया मार्केटिंग खूप प्रभावी मार्केटिंग आहे.