कमीतकमी वेळात चांगला व्यवसायाचा ब्रॅंड बनवण्यासाठी एकमेव पर्याय : सोशल मीडिया मार्केटिंग

कमीतकमी वेळात चांगला व्यवसायाचा ब्रॅंड बनवण्यासाठी एकमेव पर्याय : सोशल मीडिया मार्केटिंग

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ?

सोशल मीडिया मार्केटिंग का महत्त्वाचं आहे?

व्यवसाय वाढवायचा असेल तर ग्राहकाशी वायक्तिक संपर्क असणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे अनेक संशोधनामधून पुढं आलंय. हीच गोष्ट सोशल मीडिया मार्केटिंगच्या माध्यमातून अत्यंत प्रभाविपणे करता येते. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांशी कमी वेळात आणि कमी पैशांमध्ये तुम्ही प्रॉडक्ट आणि सेवेबद्दल माहिती देऊ शकता, त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि कायम संपर्कात राहू शकता नवनवीन उत्पादने आणि सेवांची माहिती नियमितपणे देऔ शकता. तेही तुमच्याच स्टोरीचा भाग आहेत असं त्यांना वाटावं एवढ्या प्रभाविपणे हा संपर्क होऊ शकतो.
Social Media Marketing

सोशल मीडिया मार्केटिंगमुळे कोणते फायदे होतात?

१. अपेक्षित ग्राहकांपर्यंत कमी वेळात पोहोचता येत.
२. विक्री सोबत तुमच्या व्यवसायाचा ब्रॅंड बनवता येतो.
३. कमीत कमी खर्चात जाहिराती तयार करता येतात आणि जास्तीत जास्त अपेक्षित ग्राहकांपर्यंत कमी वेळात पोहोचता येत.
४. निवडक ग्राहकांनाच आपल्या जाहिराती दाखवता येतात.
५. कंपनीच्या वस्तू किंवा सेवांसाठी संभाव्य ग्राहक आणता यतो.
६. आपल्या वेबसाइट वर ग्राहकांना घेऊन जाता येत.
७ . आपल्या पोस्ट कोणापर्यंत पोहोचता आहेत? त्यात पुरुष आणि महिलांचे प्रमाण किती? वयोगट कोणता वगैरे माहिती मिळू शकते.
८. ग्राहकांना नेमकं काय आवडतं, त्यांना काय वाटतं, त्यांचा कल, काय आवडत नाही अशा सर्व गोष्टींचा डेटा तुम्हाला यातून उपलब्ध होतो. व्यवसायाच्या वाढीसाठी आणि नियोजनासाठी हा डेटा खूप उपयोगी पडू शकतो.
9.वस्तू किंवा सेवा ऑनलाईन विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करता येणे.
सोशल मीडिया मार्केटिंग

सोशल मीडिया मार्केटिंग कशी करावी ?

तुमच्या व्यवसायासाठी सोशल मीडिया मार्केटिंग करायचं असेल तर त्यासाठी दोन मार्ग आहेत. त्या माध्यमातून तुम्ही हे सुरू करू शकता.
१. स्वत:च सुरुवात करा – तुमच्याकडे वेळ असेल, सोशल मीडिया कसा चालतो याचं पुरेस ज्ञान असेल तर तुम्हीच कंटेट तयार करु शकता. सोशल मीडियावर पारंपरिक मार्गाने गेलात तर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. प्रत्येक जण काही कंटेट तयार करण्यातला तज्ज्ञ नसतो. त्यामुळे स्वत:ला मर्यादा येतात आणि व्यवसायातून तेवढा वेळही अनेक जण काढू शकत नाहीत. सोशल मीडिया मार्केटिंग हा तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आणि गुंतण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. सोशल मीडिया मार्केटिंगसह प्रारंभ करण्यात मदत करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
1. तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये काय साध्य आहे ते ठरवा. जसे की ब्रँड जागरूकता वाढवणे, लीड निर्माण करणे किंवा वेबसाइट ट्रॅफिक वाढवणे.
2. तुमच्या टार्गेटेड ग्राहकाना ओळखा आणि ते कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक वापर करतात, त्याचा अंदाज घ्या.
3.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नुसार आणि टार्गेटेड ग्राहकानुसार कंटेंट प्लॅनिंग करा. त्यावर पोस्ट करण्यासाठी लागणारे फोटोस आणि माहिती एकत्र करा. बेसिक फोटो एडिटिंग आणि विडियो एडिटिंग स्किल्स शिकून घ्या. यूट्यूब वरुण तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकता.
4. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे प्रोफाइल तयार करा आणि जे तुमच्या व्यवसायाशी सर्वात संबंधित आहेत, त्यांना फॉलो करा.
5. तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधा: कॉमेंट्स ला रीप्लाय देऊन, प्रश्नांची उत्तरे देऊन तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधा.
6. सोशल मीडिया वर मार्केटिंग करताना सातत्य असणे खूप गरजेचे आहे. म्हणून रोजचे कंटेंट प्लॅनिंग करून सोशल मीडिया वर Active रहा.
7. तुमच्या सोशल मीडिया मार्केटिंग चे यश मोजा. आवश्यक असल्यास तुमच्या धोरणात बदल करा. आवश्यक आहे.
२. चांगल्या अनुभवी एजन्सीची मदत घ्या – व्यवसाय करताना कंटेंट तयार करून तो सोशल मीडियावर टाकणं आणि त्याचं मॉनिटरिंग करणं हे कौशल्याचं काम आहे. यासाठी प्रत्येकाकडे वेळ असेलच असं नाही. त्यामुळे चांगल्या एजन्सीची मदत घेणं हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. अशा एजन्सीकडे अनुभवी तज्ज्ञांची एक टीम असते. ती मंडली ट्रेन्ड्स लक्षात घेऊन त्या प्रमाणात कंटेंट तयार करतात. त्याचा प्रभाव हा जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला आवश्यक टार्गेट ग्रुपपर्यंत पोहण्यासाठी नियोजन, नव्या आयडिया आणि त्याची अंमलबजावणी करणं ही सगळी कामे या एजन्सी उत्तमपणे करत असतात.
SHARE

Leave a comment