स्टेशनरी व्यवसाय Stationery business.
स्टेशनरीचे दुकान उघडणे हा एक अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे, कारण त्याची मागणी बाजारात नेहमीच असते. स्टेशनरीला सर्वाधिक मागणी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये असते, जी कधीही बंद होणार नाही. तुम्ही हा व्यवसाय कमी खर्चात चालू करू शकतात फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज लागेल आणि आम्ही तुम्हाला आमच्या या लेखातून स्टेशनरी व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. चला तर आपण बघूया स्टेशनरी व्यवसाय कसा चालू करता येईल.
बाजार आणि व्यवसायाच्या क्षमतेनुसार ठिकाणाची निवड | Selection Of Location According To Market And Business Potential In Marathi
योग्य ठिकाण निवडणे अतिशय महत्वाचे आहे. या व्यवसायासाठी कार्यालय, शाळा, महाविद्यालय किंवा कोचिंग सेंटरजवळ दुकान उघडणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल किंवा मोठ्या रेसिडेंशीयल ठिकाणी किंवा जास्त लोकांची वस्ती असलेल्या ठिकाणी स्टेशनरीचे दुकान उघडणे फायद्याचे ठरेल.
दुकान उघडण्यासाठी किती जागा लागेल. Space To Open A Shop In Marathi
तुमचे बजेट पाहून तुम्हाला जागा निवडावी लागेल. अगदी घरातून ही तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता फक्त तुमचे घर शाळा महाविद्यालय किंवा रेसिडेंशीयल ठिकाणी असायला हवे. किंवा जागा एखादा दुकान गाळा
भाड्याने घेऊन सुद्धा तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता यासाठी तुम्हाला किमान 100 चौरस मीटर जागा आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्ही स्टेशनरी दुकानातील सर्व वस्तू सहजपणे व्यवस्थापित करू शकाल.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या पातळीनुसार अधिक जागा देखील घेऊ शकता.
स्टेशनरी दुकानासाठी आवश्यक कागदपत्रे | Documents Required For Stationery Shop In Marathi
यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे लागतील
1) पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
2) चालू बँक खाते
3) दुकान स्वतचे असल्यास त्यासंबंधीचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
4) दुकान भाड्याने घेतले असेल तर तुमचा आणि दुकानाचा किंवा जागेचा मालक यांच्यात करारपत्र असणे आवश्यक आहे.
परवाना आणि नोंदणीची आवश्यकता | Licensing And Registration Requirements In Marathi
‘शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’ अंतर्गत नोंदणी करावी लागेल आणि या कायद्यातील नियमांचे पालन करावे लागेल.
स्टेशनरी दुकानासाठी फर्निचर सेट करा | Furniture set for stationery shop In Marathi
हा व्यवसाय सुरू करण्यासतही फर्निचर सेट खूप महत्वाचा आहे. यामध्ये तुम्हीतुमच्या बजेट नुसार पैसे गुंतवू शकता. बजेट खूपच कमी असेल तर तुम्ही सेकंड हँड फर्निचर सेट खरेदी करू शकता जे की तुम्हाला olx.com किंवा facebook marketplace वर पाहायला मिळेल. तुम्हाला जर नवीन फर्निचर सेट खरेदी करायचा असेल तर flipkart किंवा amazon सारख्या प्लॅटफॉर्म करून खूप स्वस्तात चांगल्या प्रतीचे फर्निचर सेट खरेदी शकता.
व्यवसाय वाढीसाठी शाळा आणि कॉलेज बरोबर करार करा
तुम्हाला स्टेशनरीचे व्यवसाय वाढीसाठी हा एक पर्याय खूप फायद्याचा ठरतो . या व्यवसायात लवकर भरपूर नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला काही शाळांशी किंवा महाविद्यालयाशी करार करावा लागेल. यामध्ये तुम्ही त्या शाळांच्या कॉपी-बुक्सपासून ते मुलांसाठी स्कूल बॅग आणि ड्रेसेसपर्यंत सर्व काही पुरवू शकता. यामध्ये तुम्ही कमी मार्जिनवर काम केले तरी जास्त व्हॉल्यूममुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करता, तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात सूट मिळेल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल.
स्टेशनरीचे दुकान सुरू करण्यासाठी मला किती पैसे लागतील?
स्टेशनरी दुकान उघडण्याचा व्यवसाय कमी गुंतवणुकीत अधिक फायदेशीर व्यवसाय आहे. महाराष्ट्रात स्टेशनरीचे दुकान उघडण्यासाठी किमान ५० हजार रुपयांची गुंतवणूक करणे योग्य आहे, तुम्हाला किती मोठा व्यवसाय उघडायचा आहे त्यानुसार तुम्ही अधिक गुणतुवणूक करू शकता. तुम्ही 1 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर सुरुवात करू शकता. तुम्ही जेवढी मोठी गुंतवणूक करणार तेवढा जास्त फायदा होणार.
स्टेशनरी वस्तू कुठून खरेदी करायच्या | Where To Buy Stationery In Marathi
स्टेशनरीच्या दुकानात विकला जाणारा माल ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे विकत घेता येतो, पण लक्षात ठेवा की तुम्ही पेन, पेन्सिल, पुस्तके किंवा इतर स्टेशनरी वस्तू बनवणाऱ्या कंपनीशी थेट संपर्क साधलात तर तुम्हाला खूप फायदा मिळू शकतो. होलसेल विक्रेत्याकडून थेट खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अगदी कमी किमतीत तुम्हाला स्टेशनरी वस्तू सहज मिळू शकतात.
स्टेशनरीला मागणी आहे का?
भारतात सध्या शिक्षणावर खूप भर दिला जात असून आगामी काळातही शैक्षणिक पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे या व्यवसायातून तुम्हाला नफा मिळत राहील आणि त्याची मागणीही बाजारात कायम आहे. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल टी म्हणजे या मध्ये ट्रेंड नुसार स्टेशनरी वस्तू बदलू शकतील पण हा व्यवसाय कायम चालू राहील . जो पर्यन्त मुले शिकत राहतील तो पर्यन्त हा व्यवसाय चालूच राहील आणि वाढतच राहील . स्टेशनरीच्या व्यवसायात नफाही चांगला मिळतो. स्टेशनरी व्यवसाय किंवा दुकान चालवणे सर्वच दृष्टीने फायदेशीर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही कमीत कमी खर्चात स्टेशनरीचे दुकान उघडू शकता आणि शक्य तितक्या लवकर कमी वेळात जास्त नफा मिळवू शकता
निष्कर्ष – Stationery Shop Business Idea In Marathi
स्टेशनरी व्यवसाय असा व्यवसाय आहे कि जोपर्यंत शिक्षण संस्था चालू राहणार तोपर्यंत स्टेशनरी व्यवसाय चालू राहणार. स्टेशनरी व्यवसाय नुसता शिक्षण विषयी निगडित नसून कॉर्पोरेट सामन्धीत व्यक्तींना देखील स्टेशनरी महत्वाचे आहे. स्टेशनरी दुकान कसे चालू करावे याची आम्ही संपूर्ण माहिती आमच्या लेखात दिली आहे. तुम्हाला आमची पोस्ट आवडल्यास तुम्ही आम्हाला कंमेंट करून कळवू शकता धन्यवाद.