नवीन व्यवसाय करायचं विचार करताय ? थांबा . या 5 गोष्टींचा विचार करा आणि सुरुवात करा.
अनेक लोकांच्या डोक्यात अनेकदा काहीतरी नवीन व्यवसाय करण्याचा विचार येतो आणि काहीजण असे लोक असतात ज्यांची नवीन व्यवसाय करण्याची इच्छा असते. रोजच्या नोकरीतल्या त्याच त्याच कामाचा कंटाळा आलेला असतो आणि काही व्यावसायिकांचे यश पाहून व्यवसाय करण्याचे ठरवतात. पण व्यवसायाबद्दलची काहीच माहिती त्यांना नसते. त्यामुळे लाखो रुपये गुंतवूनही काही फायदा होत नाही. यामागील एक खास कारण म्हणजे व्यवसाय करण्यापूर्वी मार्केटचा अभ्यास न करणे. घरातून काम करणाऱ्या किंवा लहान व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या बाबतीत हे अनेकदा घडते. कारण ते अचानक एखाद्या व्यक्तीकडून प्रेरित होतात आणि व्यवसाय सुरू करतात
आजच्या काळात जवळपास सर्वच व्यवसाय ही डिजिटल झाले आहेत. जर तुम्हीही असा नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला या 5 गोष्टींचा विचार करावा लागेल.
- बिझनेस आयडीया : तुम्हाला कोणत्या क्षेत्रात व्यवसाय करायचं आहे ते आधी ठरवा. त्यामध्ये त्या व्यवसायाची भविष्यात मागणी असेल का ? आणि बदलत्या काळानुसार त्या नवीन व्यवसायात कोणते बदल होत आहेत. या सर्वाची सखोल माहिती घ्या. सर्व गोष्टी सकारात्मक दिसू लागल्या की मग पुढच्या कामाला लागा . एकदा का व्यवसाय कोणता करायचं ही ठरल की मग व्यवसायाचा प्लॅन तयार करा.
- बिझनेस प्लॅन : व्यवसायासाठी लागणारी सर्व माहिती जमा करा आणि मग व्यवसायासाठी लागणार पैसा कुठून आणायचा ? व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल कुठून आणायचा ? , त्यासाठी लागणारी मशीनरी कुठून आणायची ?, लागणारे मनुष्यबळ किती असणार आहे ? मार्केट मध्ये कसे पोहचवायचे ? सेवा किंवा उत्पादनाचा दर कसा आणि किती ठरवायचा ? अशा सर्व छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही विचार करून प्लॅन बनवा. मार्केट मध्ये व्यवसाय करण्याआधी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये विचार केला पाहिजेत आणि तोही मार्केट मधील वास्तविकतेला पकडून.
- पैशाचा योग्य वापर : नवीन व्यवसाय सुरू करताना पैशाचा ताळमेळ खूप महत्वाचा आहे. पैसा जपून वापरावा लागतो आणि त्याचा योग्य वापर करणे खूप गरजेच आहे. भांडवलाशिवाय तुम्ही व्यवसायाची कल्पनाही करू शकत नाही हे १००% खरे आहे. मात्र, आणखी एक सत्य हेही आहे की व्यवसायात जास्त पैसे गुंतवल्याने यश मिळतेच असं नाही. व्यवसायाचे स्वरूप प्रत्येक क्षणी बदलत असते. अशा परिस्थितीत एकत्र गुंतवणूक करणे शहाणपणाचे नाही. अशा वेळी तुम्ही तज्ज्ञांचे मत घेणे गरजेचं आहे.
- व्यवसायाला पुरेसा वेळ देणे : व्यवसाय सुरू करताना अनेक आव्हाने पेलावी लागतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला खूप ताकद खर्च करावी लागेल. यासाठी, तुमच्याकडे उत्तम टाईम मॅनेजमेंट कौशल्ये असणं गरजेचं आहे. व्यवसाय वाढीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल आणि संयम ठेवावा लागेल.
- तंत्रज्ञानाची सांगड : तुम्ही चालू केलेला नवीन व्यवसाय कोणताही असो याच्या जमान्यामध्ये तंत्रज्ञानाची जोड असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्ही व्यवसायात यश मिळवू शकणार नाही. त्यामध्ये बिझनेस ची वेबसाइट, सोशल मीडिया पेजेस् ,Instagram facebook , Youtube , याच्या वापरामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाला रॉकेट बनवु शकता. या सर्वाचे स्किल तुम्ही शिकून घ्या. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. त्यामुळे आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय व्यवसायात यशस्वी होणं अशक्य आहे. कारण तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमचा वेळ तर वाचवू शकताच, पण कमी खर्च करूनही नफाही मिळवू शकता. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या छोट्या व्यावसायिकांना कमी किमतीत संगणक आणि इतर तांत्रिक उत्पादने देऊन मदत करतात, ज्यांची तुम्ही मदत घेऊ शकता.
कमीतकमी वेळात चांगला व्यवसायाचा ब्रॅंड बनवण्यासाठी एकमेव पर्याय : सोशल मीडिया मार्केटिंग
स्टेशनरी व्यवसाय कसा चालू करता येईल ? how to start stationery business in marathi
डीजे व्यवसाय कसा सुरू कराल ? Starting a DJ Business in Marathi: A Step-by-Step Guide in 4 step
तुमच्या साठी खाली आम्ही 21 बिझनेस आयडीया देत आहोत, त्यामध्ये तुम्हाला योग्य वाटत असलेला व्यवसाय निवडून तुम्ही उद्योजक भरारी घेण्याची वाटचाल सुरू करू शकता.
- किराणा दुकान व्यवसाय (Grocery shop बिझनेस)
- स्टेशनरी दुकान व्यवसाय (Stationery Shop Business )
- पापड आणि लोणचे उत्पादन ( Manufacture of domestic products like papads and pickles )
- ब्रेकफास्ट शॉप उघडा ( breakfast shop business )
- डी जे सर्विस ( d j service business )
- Namkeen Making Business ( चटपटीत पदार्थांचा व्यवसाय )
- मसाला व्यवसाय ( Masala Business)
- विमा एजन्सी बिझनेस ( Insurance Agency Business )
- रसवंती व्यवसाय ( Fruit Juice Business )
- मोबाइल फूड कोर्ट ( Mobile Food Court Business )
- डिजिटल मार्केटिंग
- ऑनलाइन मार्केटिंग
- ब्लॉगिंग (make money from blogging )
- यू ट्यूब वरुण पैसे कमवा ( Make money from you tube )
- फ्रीलांसर ( become a freelancer )
- रीयल इस्टेट (real estate consultant )
- इलेक्ट्रोनिक शॉप (electronic shop )
- ट्रेडिंग बिझनेस ( share market treding business )
- सोशल मीडिया सेवा ( Social Media Service business )
- एफिलिएट मार्केटिंग ( Affiliate Marketing Online Business )
- केटरिंग बिझनेस ( Catering Business)
तुम्हाला आमची पोस्ट आवडल्यास तुम्ही आम्हाला कंमेंट करून कळवू शकता धन्यवाद.